कणकवली येथील महाविद्यालयीन युवती बेपत्ता

कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कणकवली : तालुक्यातील आशिये – वरचीवाडी येथील नुपूर विठ्ठल देवळी (वय १८) ही महाविद्यालयीन मुलगी शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. नुपूर ‘कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून बाहेर पडली, मात्र ती अद्याप घरी परतलेली नाही. तिचे वडील विठ्ठल देवळी यांनी याप्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. बेपत्ता युवतीचे वर्णन असे: तिची उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ, केस लांब, डोळे काळे, नाक सरळ असून, तिने गळ्यात चांदीची चेन घातली आहे. तसेच, अंगात मोती कलरचा टॉप व काळ्या रंगाची लेगीज परिधान केली आहे. अशा वर्णनाची मुलगी कोणासही आढळल्यास तात्काळ कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

error: Content is protected !!