युवासेना मालवण तालुका चिटणीसपदी नांदोस येथील अमित चव्हाण यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

संतोष हिवाळेकर /पोईप

शिवसेना पक्षाच्या युवासेना मालवण तालुका चिटणीसपदी अमित विजय चव्हाण यांची नियुक्ती आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने करण्यात आले आहे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामन यांनी अमित चव्हाण यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना कार्याध्यक्ष श्री पूर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी नियुक्ती जाहीर करत अमित चव्हाण यांना नियुक्तीपत्र देत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

यावेळी शिवसेना उपविभागप्रमुख भाऊ चव्हाण ,युवा सेना तालुका प्रमू स्वप्निल गावडे ,विभागप्रमुख कमलेश प्रभू, उद्योजक पंकज वर्दम, वसंत गुरुजी, बाबल नांदोस्कर, व अन्य ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते

वंदनीय हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदूत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस शुभेच्छा देत असल्याचे पत्र शिवसेना युवासेना जिल्हा संग्राम साळसकर यांनी दिले

error: Content is protected !!