पाक कला, रांगोळी व रचनात्मक कापडी पिशव्या बनविणे स्पर्धांच्या माध्यमातून सकस आहार,पर्यावरण व स्वच्छतेचा सामाजिक संदेश..
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाड्या, बचतगट, महिला, व लहान मुले यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, समृद्ध गाव देखावा, बाजारासाठी संदेश दर्शक पिशव्या बनवणे, कडधान्य कलाकृती, वेशभूषा, संगीत खुर्ची,ग्रीटिंग बनवणे इत्यादी स्पर्धांचे आयोजन लक्षवेधी ठरले असून गावातील लहान मुलं आणी महिला व पुरुष ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत सहभाग दर्शवला. यावेळी कुडाळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री प्रफुल्ल वालावलकर जिल्हा महिला व माता संरक्षण अधिकारी कांबळे भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर उमेद अभियानाचे तालुका समन्वयक गणेश राठोड, संरक्षण अधिकारी कनिष्ठ जिल्हा महिला व बालविकास कुडाळ तालुका श्री.मिलन दत्तात्रय कांबळे, सहाय्यक संरक्षण अधिकारी जिल्हा महिला व बालविकास विभाग कुडाळ-वेंगुर्ला श्री.अक्षय प्रशांत कानविंदे, वेताळ बांबर्डे समृद्ध ग्राम कार्यकारी समिती अध्यक्ष प्रसाद गावडे, उपाध्यक्ष आनंद भोगले, सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच शैलेश घाटकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदिप गावडे, साजुराम नाईक, सृष्टी सावंत, ग्रामपंचायत अधिकारी शालिनी कोकरे आदी उपस्थित होते. यावेळी कुपोषण मुक्त गाव, सकस आहार, सार्वजनिक स्वच्छता, पर्यावरण पूरक कापडी पिशव्या वापर, समृद्ध ग्रामपंचायत अभियान, संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान आदी विषयांवार मान्यवरांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.सकस आहार, मोबाईलचा अति वापर, बेटी बचाव-बेटी पढाव, ग्रामस्वच्छता याबाबत सामाजिक संदेश देणाऱ्या वेशभूषा लक्षवेधी ठरल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंगणवाडी सेविका सौ पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन ग्राम समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले. पंचायत समिती स्तरावर आदिशक्ती अभियान उपक्रमामध्ये सादरीकरण करणाऱ्या गोफ नृत्य ग्रुप नळ्याचा पाचा, वेताळ बांबर्डे महिला दहीहंडी पथक व वेताळबांबर्डे दशावतार मंडळ या ग्रुपचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.


Subscribe










