तालुकास्तरीय शासकीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी गाडीची व्यवस्था

विद्यार्थ्यांसाठी शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक यांचा स्तुत्य उपक्रम

कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा समिती अध्यक्ष श्री. देवेंद्र नाईक यांनी मोलाची मदत केली आहे.

मंगळवार दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी तालुकास्तरीय शासकीय विज्ञान नाट्य स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना जाण्या-येण्यासाठी गाडीची व्यवस्था त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यानंतर 24 व 25 सप्टेंबर रोजी तर 26 व 27 सप्टेंबर 2025 या दिवशी होणाऱ्या इलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांसाठी देखील सलग पाच दिवस विद्यार्थ्यांच्या प्रवासाची जबाबदारी त्यांनी उचलली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर झाली. या कार्याबद्दल चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई, विद्यालय व विद्यार्थ्यांच्या वतीने श्री. देवेंद्र नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

error: Content is protected !!