२३ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलीस तपास सुरू

तरुणाच्या आत्महत्येने नाईक कुटुंबावर शोककळा

दोडामार्ग : येथील पवन प्रशांत नाईक (वय २३) या तरुणाने बुधवारी रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पवनने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच, त्याला तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

या प्रकरणी दोडामार्ग पोलीस अधिक तपास करत असून, आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेमुळे नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

error: Content is protected !!