सौ. रचना रविंद्र नेरुरकर यांची शिव उद्योग संघटनेच्या महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती…

शिवसेना मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार, स्थानिक आमदार निलेश राणे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली , शिवउद्योग संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. दीपक काळीद, सरचिटणीस प्रकाश ओहले, शिवउद्योग संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख श्री. विश्वास गावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेब भवन येथे सौ.रचना रविंद्र नेरुरकर यांची महिला आघाडी सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. घटस्थापनेच्या शुभ मुहुर्तावर सौ.रचना नेरुरकर यांची नियुक्ती झाल्याने महिला वर्ग मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. जास्तीत जास्त महिलाना बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प त्यांनी यावेळी घेतला.
यावेळी शिवसेना प्रवक्त्या सौ. ज्योतीताई वाघमारे आणि माजी मंत्री श्री. विजय शिवतारे यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले.

error: Content is protected !!