राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या कार्यक्रमामध्ये सानिका तुळसकर यांचा सन्मान

वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या कार्यक्रमामध्ये सिताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना सन्मानित करण्यात आले.

नवरात्रोत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या माध्यमातून ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सिताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांचा देखील सन्मान करण्यात आला.

सानिका तुळसकर यांचा जीवन प्रवास हा फार खडतर असून या प्रवासात त्यांना अपार कष्ट घ्यावे लागले. सध्या त्या सिताराम संजीवनी आश्रमामध्ये मुख्य परिचारिका म्हणून कार्यरत असून रुग्णांची सेवा करत आहेत. आजवर आश्रमातील अनेक रुग्णांना बरं करून त्यांनी घरी पाठवले आहे. त्यांचे सेवाकार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांनी आजवर केलेल्या कार्यकर्तृत्वाचा सन्मान म्हणून त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित ‘नवदुर्गा महिला शाही सन्मान’ या कार्यक्रमांमध्ये गौरविण्यात आले.

error: Content is protected !!