वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा-भोजदळवीवाडी येथील ७४ वर्षीय दत्ताराम वासुदेव दळवी हे १८ सप्टेंबरपासून बेपत्ता होते. अखेर, २१ सप्टेंबर रोजी त्यांचा मृतदेह होडावडा आणि तळवडे गावांदरम्यानच्या नदीपात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.
१८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजता दत्ताराम दळवी हे गुरे चरवण्यासाठी गेले होते, त्यानंतर ते परत आलेच नाहीत. १९ सप्टेंबर रोजी त्यांच्या मुलाने, सुनील दत्ताराम दळवी यांनी, वेंगुर्ला पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास, त्यांचा मृतदेह नदीत तरंगताना दिसला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी पंचनामा करून आणि शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. या प्रकरणी वेंगुर्ला पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.