कुडाळ : खासदार मान. नारायणराव राणेसाहेब यांच्या संकल्पनेतुन राणे परिवार आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे कुडाळ येथे सिंधुदुर्गचा आवडता आणि भक्तांच्या हाकेला धावणारा सिंधुदुर्गचा राजा २१ दिवसांसाठी विराजमान झाला आहे.. अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक उपक्रम राबवून भक्तगण सिंधुदुर्ग राजाची सेवा करत आहेत. यानिमित्ताने आमदार मान. निलेशजी राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ-मालवण विधानसभेच्या वतीने श्री सिंधुदुर्ग राजा दरबारात उद्या दिनांक १० सप्टेंबर रोजी “रक्तदान शिबिर” आयोजित करण्यात आले आहे.तरी आपण सर्वांनी या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाची वेळ :उद्या बुधवार दिनांक १० सप्टेंबर सकाळी ०९:०० वाजल्या पासून कार्यक्रमाचे स्थळ : श्री सिंधुदुर्ग राजा दरबार व्यासपीठ, कुडाळ