नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास त्याची पडताळणी करा

मा.आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांची जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी

जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांचा सकारात्मक प्रतिसाद

       ओरोस येथे सिंधुदुर्ग जिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांची आज माजी आमदार वैभव नाईक व कणकवली विधानसभाप्रमुख सतीश सावंत यांनी भेट घेतली.  मतदार यादीत मतदारांच्या झालेल्या दुबार नोंदी, जिल्हा परिषद मतदारसंघाची रचना, ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग रचना याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी मतदार यादीबाबत आक्षेप नोंदविल्यास त्याची पडताळणी करण्यात यावी अशी मागणी वैभव नाईक व सतीश सावंत यांनी केली. त्यावर मतदार यादीबाबत नागरिकांना आक्षेप असतील तर त्यांची लेखी तक्रार द्यावी त्याची पडताळणी केली जाईल असे बालाजी शेवाळे यांनी सांगितले. 
         यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बंडू ठाकूर, अतुल बंगे, बाळू पालव, सिद्धेश राणे, अमित राणे, संजय रावले आदि उपस्थित होते.
error: Content is protected !!