शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांची उपस्थिती
कुडाळ : फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड आयोजित उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या वतीने भव्य अशा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये एकूण ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर यांनी देखील या शिबिराला भेट दिली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मागील महिन्यातच रक्तदान केल्यामुळे त्यांना यावेळी रक्तदान करता आले नाही. त्यांनी देखील आतापर्यंत एकूण ३५ वेळा रक्तदान केले आहे.
फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड नेहमीच सामाजिक उपक्रम राबवत असतात. आतापर्यंत त्यांनी अनेक गरजू लोकांना मदत केली आहे. काल देखील त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.