कुडाळ शहराची शोभा वाढवणारा सेल्फी पॉईंट बंद अवस्थेत

कुडाळ : कुडाळ शहराची शोभा वाढवणारा कुडाळ एस. टी. स्टँड समोरील सेल्फी पॉईंट सध्या बंद अवस्थेत आहे. लवकरात लवकर हा सेल्फी पॉईंट पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

४ वर्षांपूर्वी शहरात बसवण्यात आलेल्या या सेल्फी पॉईंटमुळे कुडाळ शहराच्या सौंदर्याला चार चांद लागले. रात्रीच्या वेळी तर या सेल्फी पॉईंटमुळे आजूबाजूचा परिसर चमकून जायचा. परंतु गेल्या काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे.

सध्या गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक असून मुंबईकर चाकरमानी मोठ्या संख्येने कुडाळमध्ये दाखल होणार आहेत. कुडाळमध्ये उतरल्यानंतर हे चाकरमानी आपल्या गावी जाण्यासाठी सर्वप्रथम बस स्थानकात दाखल होतात. अशातच हा बंद अवस्थेत असणारा सेल्फी पॉईंट चाकरमान्यांच्या निदर्शनास येणार आहे. तेव्हा गणेश चतुर्थीपूर्वी हा सेल्फी पॉईंट पूर्ववत सुरू करण्यात यावा अशी मागणी सध्या नागरिकांमधून होऊ लागली आहे.

error: Content is protected !!