कुडाळ : मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून पावशी बेलनदी येथे पडलेल्या भगदाडामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ सुरू असते. दररोज हजारोंच्या संख्येने महामार्गावरून वाहने येत – जात असतात. त्यामुळे खड्ड्यांमध्ये मार्ग काढताना वाहनावरील ताबा सुटून अपघात होण्याची देखील शक्यता असते. यापूर्वी देखील अनेक जणांनी महामार्गावरील खड्ड्यांमुळे आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
पावशी बेलनदी पूल येथे वारंवार खड्डे पडत असून त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली जाते. सध्या या पुलावर पडलेलं भगदाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या भागदादामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.