ॲड. अमोल सामंत यांचा यशस्वी युक्तिवाद
लाकडी दांड्याने मारहाण करून केले होते जखमी
कुडाळ तालुक्यातील गिरगाव येथील घटना
कुडाळ : जागेच्या कारणावरून शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीची पोलिस कोठडी सत्र न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी नाकारली आहे. आरोपीच्या वतीने ॲड. अमोल सामंत यांनी काम पाहिले.
रविवार दिनांक ४ मे २०२५ रोजी सायं. ६.३० वाजण्याच्या सुमारास गिरगाव (गावठाणवाडी) येथील प्रकाश न्हानू गुरव व त्यांची पत्नी प्रिया प्रकाश गुरव यांना शिवीगाळ करून डोक्यावर लाकडी दांड्याने मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी गुरुनाथ न्हानू गुरव याला २२ जुलै २०२५ रोजी अटक करण्यात आली होती.
गुन्ह्यातील आरोपी गुरुनाथ गुरव (गिरगाव,गावठाणवाडी) हा गुन्हा केल्यानंतर राहत्या घरातून मुंबई येथे निघून गेला होता. तसेच पोलिसांच्या तपासकामात सहकार्य करत नव्हता. शिवाय मारहाण करण्यासाठी वापरण्यात आलेला दांडा कोठे ठेवला आहे याची माहिती देत नव्हता. याबाबत आरोपीची सखोल चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी पोलिसांनी केली होती. ही मागणी सत्र न्यायाधीश जी. ए. कुलकर्णी यांनी फेटाळली असून आरोपीला ५० हजारांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरोपीच्या वतीने ॲड. अमोल सामंत यांनी बाजू मांडली.



Subscribe









