भाजपा भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांची आमदार नितेश राणे यांच्या प्रचारात आघाडी

सिंधुदुर्ग : कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार व महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारात भाजपा भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी आघाडी घेतली आहे. प्रचार सुरू झाल्यापासून भटके विमुक्त वाडी वस्ती वरती भेटीगाठी घेत नेत्याचं काम आणि पक्षाची ध्येय धोरण पटवून देत इतर पक्षातील समाज बांधवांना भारतीय जनता पार्टी पक्षांमध्ये प्रवेश करून घेणे, समाज बांधवांची नाराजी दूर करून जाहीर पाठिंबा घेणे, राज्यात चाललेल्या विरोधकांच्या प्रत्येक हालचाली वरती लक्ष ठेवून खोटा प्रचार करणाऱ्या विरोधकांचा वेळोवेळी समाचार घेणे व समाज माध्यमाच्या माध्यमातून जनतेला महायुतीचा कार्य आमदार नितेश राणे यांचे कार्य समजावून सांगणे अशा प्रकारचा प्रचार जिल्हाध्यक्ष नवलराज काळे यांनी कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये केला. पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून वाढीवस्ती वरती प्रचार बैठका आयोजित करून समाजाचे प्रश्न जाणून घेतले. आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावले जातील असा विश्वास नवलराज काळे यांनी समाज बांधवांना दिला आहे. 20 नोव्हेंबर 2024 रोजी आमदार नितेश राणे यांना कमळ चिन्हावरील बटन दाबून आमदार नितेश राणे यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन नवलराज काळे यांनी मतदारांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *