सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर आज कोल्हापूर येथील युवक खोलदरीत कोसळला आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असताना तो पाय घसरून पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
त्याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. सावंतवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. संबंधित तरूणा समवेत आणखी चार मित्र होते. मात्र हा नेमका प्रकार कधी घडला?, कसा घडला? याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश कांडरकर यांनी दिली. घटनास्थळी आपली टीम पोचली असून त्या ठिकाणी दाट धुके तसेच मोबाईल रेंज नसल्यामुळे मदतकार्य किंवा माहिती घेण्यास अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










