आंबोली : चौकुळ चिखलव्हाळ बेरडकी येथील सागर विठ्ठल नाईक याच्यावर एका अल्पवयीन मुलीस दमदाटी करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आंबोली पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला चंदगड येथून ताब्यात घेण्यात आले. ही घटना २२ जून रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. संशयित आरोपी सागर नाईक याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सावंतवाडी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती मुळीक करत आहेत.