राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत भालाफेक मध्ये पहिला क्रमांक
बालेवाडी-पुणे येथे झालेल्या स्पर्धेत ४७.४५ मीटरची भालाफेक
कुडाळ : एस के पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट पंचक्रोशी संचलित एस एल देसाई विद्यालय व कै सौ एस आर पाटील ज्युनिअर कॉलेज पाटचा अकरावीचा विद्यार्थीं कुमार दर्शन दशरथ पडते भालाफेक या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लखनौ उत्तरप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तो खेळणार आहे. त्याबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दर्शन पडते याने दिनांक ११ ते १३ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत बालेवाडी पुणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील भालाफेक या क्रीडा प्रकारात उत्कृष्ट कामगिरीची नोंद करत ४७.४५ मीटर भालाफेक करत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याची निवड लखनऊ उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दर्शन पडते याला प्रशालेचे मुख्याध्यापक राजन हंजनकर व क्रीडा शिक्षक संजय पवार, दत्तात्रय कुबल व अन्य पालक वर्ग यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्यांचे संस्था उपाध्यक्ष दिगंबर सामंत, संस्था कार्याध्यक्ष समाधान परब, सचिव अवधूत रेगे, संस्था सदस्य सुधीर ठाकूर, देवदत्त साळगावकर, राजेश सामंत, सुभाष चौधरी, दीपक पाटकर, नारायण तळवडेकर, पर्यवेक्षक सयाजी बोंदर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले आहे.