संतोष हिवाळेकर/ पोईप
मागील काही दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टीने पोईप गोळवण कट्टा मुख्य मार्गावरील पोईप धरणानजिक असलेली मोरी कॉजवे अवजड वाहनाच्या वाहतुकीने खचून आतील पाईप फुटल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन या कोजेबाबत उपाययोजना करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी केले आहे
मागील काही दिवसापासून मालवण बेळणे मार्गावरील विरण येतील पुलाची संरक्षण भिंत कोसळल्याने या पुलावरून अवजड वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे मसदेतिठा गोळवण पोईप अशी एसटी बस व अवजड वाहनाची वाहतूक चालू करण्यात आली आहे त्यामुळे गेल्या कित्येक वर्षाचा हात वाजले अवजड वाहनाच्या वाहतुने पूर्णतः खजला कसला असून आतील पाईप फुटले असून डांबरीकरणाला भेगा पडल्या आहेत
याबाबत शनिवारी सकाळी माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल कांदळकर ,मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्याम चव्हाण , पोईप सरपंच श्रीधर नाईक, तसेच पोईप येरमवाडीतील ग्रामस्थ यांनी भेट देत येथील परिस्थिती जाणून घेतली व लवकरच बांधकाम विभागाकडून या कॉजवेची दुरुस्ती करण्यात येईल असे सांगण्यात आले
तसेच यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी कॉजवेवर पडलेल्या खड्ड्यात चिरे टाकून तात्पुरती उपाययोजना केली आहे परंतु यावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहे बांधकाम विभागाने याची दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली हा रस्ता वाहतुकीस बंद झाल्यास गोळवण पोईप बरोबरच इतर परिसरातील एसटीच्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे















