Category महाराष्ट्र

करुळ घाट वाहतुकीसाठी सुरु

सिंधुदुर्गनगरी : तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर महामार्गावरील करुळ घाटात दरड कोसळल्याने ह्या घाट मार्गावरील वाहतूक दिनाक १२ सप्टेंबर २०२५ पर्यंत बंद करण्यात आलेली होती.दरड कोसळल्याने बाधित झालेल्या भागातील तसेच इतर संभाव्य धोका निर्माण करू शकणाऱ्या ठिकाणांवर संरक्षणात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. दुरुस्तीचे काम…

जिल्ह्यातील रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली…

१५० दिवसांचा कृति आराखडा आढावा

ई-प्रशासनाच्या दृष्टिने सर्वंकष सुधारणा करा – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा यशस्वीपणे राबविण्यात आला. आता राज्य शासनाने 150 दिवसांच्या कृति आराखड्याअंतर्गत ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासकीय सुधारणा करण्यावर भर दिला आहे.…

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान प्रशिक्षण बिनकामी!

अगोदर स्वच्छ भारत अभियानातंर्गत बांधलेल्या शौचालयांचे पैसे अदा करा – गुरुदास गवंडे. सावंतवाडी : सध्या सावंतवाडी तालुक्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानातर्गत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.मात्र ऑक्टोंबर 2023 पासून सावंतवाडी तालुक्यातील १९० लाभार्थी यांनी स्वच्छ भारत…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित

सिंधुदुर्गनगरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असून, जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आज आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवार निवडणूक लढवू शकतो. गेली साडेतीन वर्षे…

शिवम राजेश कविटकर यांना इंडियन नेवीमध्ये सी.वन ग्रेड

माजी खासदार विनायक राऊत यांनी केला सत्कार कुडाळ : माजी जि प सदस्य राजू कविटकर यांचे चिरंजीव श्री शिवम राजेश कविटकर यांची इंडियन नेव्ही मध्ये सी वन ग्रेड मिळाल्याबद्दल त्यांचा माजी खासदार विनायक राऊत यांनी शाल व श्रीफळ देऊन सत्कार…

कुडाळ-बिबवणे येथे बेकायदेशीर दारू विक्रीवर पोलिसांची कारवाई

९० हजार ४०० चा मुद्देमाल जप्त कुडाळ : विक्री करण्याच्या उद्देशाने गैर कायदा बिगर परवाना गोवा बनावटीची दारू बाळविल्या प्रकरणी बिबवणे नाईक वाडी येथील संतोष देऊलकर (वय 35) याचे वर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . या कारवाईत…

अवैध पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन तिघांना अटक

कुडाळ पोलिसांची कारवाई तब्बल १० लाखांचा मुद्देमाल जप्त कुडाळ : अवैध पानमसाला, सुगंधी तंबाखू वाहतूक करणाऱ्या ट्रकचा पाठलाग करुन कुडाळ पोलिसांनी तब्बल तिघांना अटक केली असून त्यांच्याकडुन ट्रक सह तब्बल १० लाख ८७ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

गोवा राज्यातील विविध विरोधी पक्षांच्या स्थानिक परप्रांतीय प्रश्न उपस्थित करत केलेल्या विरोधामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी MRF नोकर भरती मेळावा रद्द

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांची माहिती. मनसे सिंधुदुर्गच्या वतीने शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर रोजी एमआरएफ गोवा येथील कंपनी मध्ये प्रक्षिणार्थी भरती मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा आयोजित करताना कोणतेही शुल्क न आकारता विनामूल्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवकांना रोजगाराच संधी…

पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा १२ सप्टेंबर रोजी वेंगुर्ले तहसीलदार कार्यालय येथे जनता दरबार

वेंगुर्ले : मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. तरी ज्या ज्या नागरिकांना शासन…

error: Content is protected !!