Category बातम्या

महायुतीचे उमेदवार दादा साईल यांच्या प्रचाराचा श्रीगणेशा

पावशी मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात कुडाळ/प्रतिनिधी : कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला. गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी मतदारसंघातील प्रमुख देवस्थानांचे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प सोडला.…

धोपेश्वर गणातून पंचायत समिती सदस्यपदासाठी श्री. अरविंद लांजेकर यांचा अपक्ष अर्ज दाखल

राजापूर : धोपेश्वर पंचायत समिती गणातून राजापूर पंचायत समिती सदस्यपदासाठी श्री. अरविंद लांजेकर यांनी आज मंगळवार, दि. २१जानेवारी २०२६ रोजी सकाळी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज त्यांनी निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडे सादर केला. अर्ज…

कश्मिरा केतन शिरोडकर यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज

कुडाळ : कश्मिरा केतन शिरोडकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेतून बंडखोरी करत अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक पक्षातून आज बंडखोरी पाहायला मिळाली. पिंगुळी पंचायत समिती मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या. पक्षाकडून…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अर्जांचा पाऊस

७१३ उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ ची रणधुमाळी सुरू झाली असून, २१ जानेवारी २०२६ पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मोठ्या उत्साहात पार पडली. प्राप्त झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, संपूर्ण जिल्ह्यातून…

युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांचा राजीनामा

कुडाळ : उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी आपल्या पदासह पक्षाचा राजीनामा दिला. जिल्हा परिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर अनेक पक्षांमध्ये नाराजी नाट्य रंगू लागले आहे. आज युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर यांनी शिवसेनेला (उबाठा) जय…

कणकवली तालुक्यातील ८ जि. प. जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी दाखल केले अर्ज

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यात भाजपला बंडखोरीची फटका बसला आहे . नाटळ, हरकुळ खुर्द, फोंडाघाट या तिन्हा जिल्हा परिषद मतदारसंघात तर कलमठ, खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातही भाजप अंतर्गत बंडखोरी उफाळली आहे. भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष…

कुडाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी

कुडाळ : जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेना – काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. जि.प. आंब्रड – शेजल…

कुडाळमध्ये राजकीय रणधुमाळी!

जिल्हा परिषदेसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ६४ उमेदवारांचे अर्ज कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, प्रमुख…

अखेर हरकुळ मतदार संघातून मनोज रावराणे यांना उमेदवारी

कणकवली : गेले काही दिवस या मतदारसंघातील पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते त्याकडे होते सर्वांचे लक्ष कणकवली तालुक्यातील हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघामधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल…

दीपक नारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

कुडाळ : घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून केशव उर्फ दीपक नारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीचे ते अधिकृत उमेदवार असून कुडाळ पंचायत समितीचे ते माजी सदस्य आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

error: Content is protected !!