Sindhudarpan

Sindhudarpan

राज्यसरकारचा सरकारी कर्मचऱ्यांच्या पागराविषयी मोठा निर्णय

मुंबई: महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर गुरुवारी मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यापैकी सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराची खाती आता मुंबै बँकेत उघडण्यात येणार आहेत.भाजपचे आमदार आणि देवेंद्र…

मा.आमदार राजन साळवी भाजपकडे जाणार का?

राजन साळवी यांनी केला खुलासा राजापूर: कोकणात सद्ध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे ती माजी आमदार राजन साळवी भाजपा मधे प्रवेश करणार का या प्रश्नाची.राजापूरचे उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी हे लवकरच भाजपत प्रवेश करणार अशी राजकीय वर्तुळात चर्चा…

तीन प्रकारची बँक खाती होणार बंद

आरबीआयचा मोठा निर्णय मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेनं 2025 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारीपासून बँकिंगच्या काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम कोट्यवधी नागरिकांवर पडू शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे. इनअ‍ॅक्टिव्ह खाती…

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या बाबतीत सरकारचा मोठा निर्णय

मुंबई: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमुळे राज्यातील पात्र निराधारांना दिलासा मिळतो. मात्र निराधारांना लाभ मिळण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेच्या अर्थसाहाय्याचे वितरण हे थेट लाभ हस्तांतरण (DBT) पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग…

मोठी बातमी! जात पडताळणी प्रक्रिया होणार ऑनलाईन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अधिकाऱ्यांना आदेश मुंबई: जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो. या प्रमाणपत्रासाठी सर्वसामान्यांना अनेकदा शासकीय कार्यालयांची पायरी चढावी लागते. शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांना आपल्या गावी जावून पाठपुरावा करावा लागतो.अनेकदा याबाबतच्या कामांना अडचणी…

तालुकास्तरीय गायमर्यादीत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत महालक्ष्मी उपळे संघा विजयी

राजापूर: शहरानजीकच्या कोंढेतड धोपटेवाडी येथील शिवप्रेमी क्रीडा मंडळाच्यावतीने आयोजित तालुकास्तरीय गायमर्यादीत ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये आयसीसी पन्हळे संघाचा पराभव करीत महालक्ष्मी उपळे संघाने विजेतेपद पटकाविले. दूर्गादेवी विल्ये, आणि शिवप्रेमी कोंढेतड यांनी अनुक्रमे तृतीय आणि चतुर्थ क्रमांक पटकाविला. सर्व विजेत्या संघांना मांन्यवरांच्या…

सिंधुदुर्गात कर्नाटक मलपी हायस्पीड नौकांवर कारवाईचा सपाटा सुरूच

हायस्पीड नौकावर सुरु असलेल्या कारवाई बाबत मच्छिमार वर्गातून समाधान व्यक्त मत्स्य बंदरे विभाग मंत्री नितेश राणे तसेच आ.निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश मालवण : आ.निलेश राणे यांनी विधानसभेत कर्नाटक मलपी येथील हायस्पीड नोकांविरोधात आवाज उठवला होता. त्यावर तत्परतेने कार्यवाही चालू…

सिंधुदुर्ग : प्राथ. शिक्षक समितीचे कुडाळ पं. स. समोर धरणे आंदोलन

एक राज्य, एक गणवेश त्रुटींविरोधात आंदोलन पोषण आहारबाबत दिलेल्या नोटिसांचा निषेध कुडाळ: अलीकडेच शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी जिल्हापरिषद प्राथमिक शाळांच्या गणवेशाबाबत महत्वपूर्ण अशा योजनेची घोषणा केली आहे.दरम्यान याच पार्शवभूमीवर ‘एक राज्य, एक गणवेश’ योजनेतील असंख्य त्रुटी दूर करा, संचमान्यता…

स्थलांतरित कामगारांसाठी होणार स्मार्ट रेशन कार्ड

आनंदाचा शिधा वाटपाची दिनदर्शिका तयार करा अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: रोजच्या भाकरीसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करणाऱ्या कामगारांचा विचार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत स्थलांतरित…

शाळांच्या पोषण आहाराचे होणार ऑडिट

माहिती सादर न करणाऱ्या शाळांवर दंडात्मक कारवाई मुंबई: प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत जिल्हा परिषद व प्राथमिक शिक्षण संचालनालय स्तरावरून शाळांना शालेय पोषण आहारासाठी अनुदान दिले जाते. याच अनुदानाच्या माध्यमातून शाळांकडून विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो.यामध्ये अनेकवेळा अनियमितता झाल्याच्या तक्रारी…

error: Content is protected !!