दोडामार्ग : दोडामार्ग हा काजूचा तालुका आहे. या तालुक्यात काजूवर आधारित प्रकल्प यावेत यासाठी ब्राझील सरकारशी बोलणी सुरु आहे, अशी माहिती महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. ते म्हणाले,तालुक्याचा विकास निश्चित आहे.त्याबद्दल शंका बाळगण्याचे कारण नाही.तालुक्यातील रस्ते हे विकासाची नांदी आहे. तालुका राज्यातील शेवटचा तालुका असला तरी तो सर्वात प्रगत तालुका असेल.आडाळी एमआयडीसी लगेच सुरु करायला कुणाकडेच जादूची कांडी नाही.आतापर्यंत ४७ जणांनी भूखंड आरक्षित केले आहेत.आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या की उद्योग सुरु होणार आणि रोजगारही मिळणार. मात्र काहीजण स्थानिकांना हाताशी धरून वेगवेगळे आरोप करुन चुकीची माहिती पसरवत आहेत. त्यात तथ्य नाही.तिलारीत अनेक पर्यटन व्यवसाय व प्रकल्प सुरु होणार.जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी तयार होणार, काही डीवायपाटील संस्थेमधून येणार.दोडामार्गमधील रुग्णालयाची इमारत पूर्ण झाली की आवश्यक सर्व वैद्यकीय अधिकारी व सुविधा येणार. नंतर गोव्यात वैद्यकीय उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही, असे सांगून त्यांनी कसई दोडामार्ग नगरपंचायत हद्दीत व तालुक्यात केलेल्या कामांचा उल्लेख केला तसेच भविष्यातील कोणकोणती कामे आपण करणार हेही सांगितले.
यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट )तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजपचे तालुकाप्रमुख सुधीर दळवी, आरपीआयचे तालुकाप्रमुख प्रकाश कांबळे, जिल्हाप्रमुख रमाकांत जाधव, ऍड. नीता सावंत, भगवान गवस,राजेंद्र निंबाळकर, चंदू मळीक, दयानंद धाऊसकर, सज्जन धाऊसकर,दादा देसाई, रामदास मेस्त्री, चंद्रकांत शिरोडकर,नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, शैलेश दळवी आदी उपस्थित होते.
त्यांना दिलेली डेडलाईन संपली
भाजपमधील काही जण महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली व अपक्ष उमेदवार विशाल परब यांना पाठींबा देऊन पक्षविरोधी काम करत आहेत. त्यांची नावे वरिष्ठाना कळवली आहेत.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांनी त्यांना १२ नोव्हेंबर पर्यंत परत येण्याचा अल्टीमेटम दिला होता. पण त्यांना दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आता कारवाईचा निर्णय वरिष्ठ घेतील, मी यादी पाठवली आहे, अशी माहिती भाजपचे तालुकाध्यक्ष सुधीर दळवी यांनी दिली. तर नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी त्यांची हकालपट्टी अटळ असल्याचे सांगितले.