माध्यमिक शालांत परीक्षेत शिवडाव हायस्कूल चे घवघवीत यश ; १००% टक्के निकालाची परंपरा कायम

९७:२०% गुणांनी समर्थ शिरसाट प्रथम ; ९४:२०% गुणांनी निधी कोरगावकर द्वितीय तर ९३:८०% गुणांनी पार्थ गोसावी तृतीय

कणकवली : मंगळवारी माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यामध्ये कणकवली तालुक्यातील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव या प्रशालेने १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी देखील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव चा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १००% टक्के लागला आहे.

यामध्ये समर्थ चंद्रकांत शिरसाट याने ९७:२०% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर कु. निधी नामदेव कोरगावकर हिने ९४:२०% गुण मिळवून द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसेच कु. पार्थ रामनाथ गोसावी ९३:८०% गुण मिळवून प्रशालेत तृतीय क्रमांक मिळवला आहे.

या परीक्षेत एकूण ३२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी १६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले, १० विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ६ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक श्री. मुकेश पवार यांनी शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव च्या वतीने अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!