विजेता आचरा जामलुड क्रिकेट संघ तर उपविजेता जयंती देवी पळसंब संघ
मालवण : तालुक्यातील आचरा येथील चिंदर लब्देवाडी ब्राह्मणदेव मित्रमंडळ आयोजित २०२५ चषक पर्व दुसरे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले दि. 2 फेब्रुवारी 2025 रोजी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आचरा विभाग संघटक केदार परुळेकर,अमोल मांजरेकर, स्वप्निल वराडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत ब्राह्मणदेव मित्रमंडळ 2025 चे मानकरी आचरा जामलुड ठरला,उपविजेता जयंती देवी पळसंब संघ ठरला तर तृतीय उपविजेता जहीर स्पाॅर्ट संघ ठरला. मालिकावीर अक्षय वाडेकर,उत्कृष्ट फलंदाज तन्मय पेडणेकर, उत्कृष्ट गोलंदाज पापा राठोड यांना आकर्षक चषक व रोख पारितोषिक देऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, समीर लब्दे, सागर लब्दे सुहास लब्दे दिनेश लब्दे दीपक लाड दर्शन लाड गणेश लाड निखिल लब्दे गणेश कावले विराज लब्दे उमेश लब्दे उल्हास लब्दे निलेश मांजरेकर निलेश चेंदनकर राज लब्दे, संतोष लाड , सुभाष लाड,संजय लब्दे,प्रमोद लब्दे ,आदि आचरा ग्रामस्थ उपस्थित होते.


Subscribe










