संदेश नाईक व युवा सेनेच्या स्वानंद उपाध्ये यांचा पुढाकार
हुमरमाळा वालावल करमळीवाडी इथे असलेले सचीन पेडणेकर यांच्या घराच्या लगत असलेला लाईटचा पोल संदेश नाईक व युवा सेना स्वानंद उपाध्ये यांच्या माध्यमातून काढण्यात व दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आला .
हुमरमाळा वालावल येथील सचिन पेडणेकर यांच्या अगदी घरालगत इलेक्ट्रिसिटीचा पोल होता. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात घरातील लोकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत होते. पेडणेकर यांनी ही बाब संदेश नाईक व युवा सेनेचे स्वानंद उपाध्ये यांच्या कानावर घातली. यानंतर संदेश नाईक व स्वानंद उपाध्ये यांनी स्वतः लक्ष घालून हा विद्युत पोल स्थलांतरित करून घेतला. यावेळी पेडणेकर कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
आ. निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून गावातील विकासकामे पूर्ण करून देणार असा शब्द विश्वास उपाध्ये यांनी दिला.















