परप्रांतीय कामगाराला ७ ते ८ जणांकडून बेदम मारहाण

सावंतवाडी : दुसऱ्याकडे कामावर गेल्याच्या रागातून झारखंड येथील परप्रांतीय कामगाराला ठेकेदार व अन्य ७ ते ८ सहकाऱ्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज ७ वाजता बावळाट येथे घडली. अधिक उपचारासाठी त्या कामगाराला येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांसह अन्य कामगारांनी रूग्णालयात गर्दी केली आहे. या प्रकरणी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान कामगाराला अशाप्रकारे बेदम मारहाण करणाऱ्या संबंधित ७ ते ८ संशयितांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्याच्या सहकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.

error: Content is protected !!