सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो
सूप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील यांची विशेष उपस्थिती
कुडाळ : चिमणी पाखरं डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नृत्य क्षेत्रातील पुरस्कार वितरणाचा सर्वात मोठा अवॉर्ड शो अर्थात नृत्य सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन शनिवार दिनांक १५ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता मराठा समाज हॉल कुडाळ येथे करण्यात आले आहे.
या सन्मान सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे इंडियन फिल्म इंडस्ट्री मधील सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आशिष पाटील हे उपस्थित राहणार आहेत. यासोबतच आपल्या जिल्ह्यातील सुप्रसिद्ध नृत्यांगना कुमारी दीक्षा नाईक हिची आशिष पाटील यांच्या सेलिब्रिटी कलाकारांच्या सुंदरी या डान्स शो मध्ये निवड झाल्याबद्दल तिचा सन्मान केला जाणार आहे. तसेच या सोहळ्यामध्ये जिल्ह्यातील ८० कलाकारांचे सन्मान होणार आहेत. सोबतच टीव्ही अवॉर्ड्स प्रमाणे भव्य दिव्य असा रंगमंच, विद्युत रोषणाई, डान्स परफॉर्मन्स, सेल्फी पॉईंट, एलईडी स्क्रीन वॉल आणि सेलिब्रिटी कलाकारांचे डान्स परफॉर्मन्स देखील होणार आहेत.
तेव्हा सर्वांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन चिमणी पाखर डान्स अकॅडमीचे सल्लागार सुनिल भोगटे व अध्यक्ष रवी कुडाळकर यांनी केले आहे.