खुशखबर होळी साठी मध्य रेल्वे २८ विशेष ट्रेन सोडणार

पहा कसे आहे वेळापत्रक:कधी काढणार तिकीट

ब्युरो न्यूज: कोकणात शिमगो म्हटलो की एक विशेष आकर्षण असता ता घराकडे येणाऱ्या सोंगांचा,राधेचा, आणि होळीचा, शेवयांचा. होळी म्हटली की कोकणात ही गर्दी..ह्याच गर्दीचो विचार करून होळीक येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेन विशेष 28 गाडी सुरू केले आसत.

१३ मार्चला होळीचा सण असून अनेकांनी रेल्वेचे बुकिंग करण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने (Central Railway) मुंबई – नागपूर / मडगाव / नांदेड आणि पुणे -नागपूर दरम्यान २८ होळी विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस द्वि-साप्ताहिक विशेष (८ सेवा)

ट्रेन क्रमांक 02139ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च साणि १८ मार्च रविवार आणि मंगळवार) रोजी ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.१० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 02140 ही द्वि-साप्ताहिक विशेष ट्रेन नागपूर येथून दि.९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च (रविवार आणि मंगळवार) रात्री ८ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल.

या गाडीसाठी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापुर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत.

२. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -मडगाव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)

ट्रेन क्रमांक 01151 साप्ताहिक विशेष ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दि. ६ मार्च आणि १३ मार्च (गुरुवार) रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01152 ही साप्ताहिक विशेष ट्रेन मडगाव येथून दि.६ मार्च आणि १३ मार्च (गुरुवार) रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि हे थांबे देण्यात आले आहेत.

३. लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव -लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)

ट्रेन क्रमांक 01129 साप्ताहिक विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दि. १३ मार्च आणि २० मार्च (गुरुवार) रोजी २२.१५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01130 ही साप्ताहिक विशेष ट्रेन दि. १४ मार्च आणि २१ मार्च (शुक्रवार) रोजी मडगाव येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल.

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड हे थांबे देण्यात आले आहेत.

४. लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (४ सेवा)

साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01105 दि. १२ मार्च आणि १९ मार्च (बुधवार) रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री ००.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी रात्री ९.०० वाजता पोहोचेल

.साप्ताहिक विशेष ट्रेन 01106 ही नांदेड येथून दि. १२ मार्च आणि १९ मार्च (बुधवार) रोजी रात्री २२.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.०५ वाजता पोहोचेल.

या गाडीला ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुईवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा आदी थांबे देण्यात आले आहेत.

. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विशेष (४ सेवा)

साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01469 ही दि. ११ मार्च आणि १८ मार्च (मंगळवार) रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल.

साप्ताहिक विशेष ट्रेन क्रमांक 01470 नागपूर येथून दि. १२ मार्च आणि १९ मार्च (बुधवार) रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.

६. पुणे – नागपूर – पुणे साप्ताहिक विश् (४ सेवा)

विशेष ट्रेन क्रमांक 01467 ही पुणे येथून दि. १२ मार्च आणि १९ मार्च (बुधवार) रोजी दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल.

विशेष ट्रेन क्रमांक 01468 ही नागपूर येथून दि. १३ मार्च आणि २० मार्च (गुरुवार) रोजी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल.01469/01470 आणि 01467/01468 या गाडीसाठी उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे देण्यात आले आहेत.

विशेष ट्रेन क्रमांक 02139/02140, 01151/01152, 01129/01130, 04169/04170, 01467/01468 आणि 01105 चे बुकिंग दि. २४.०२.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.inसंकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होणार तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. असे आवाहन मध्य रेल्वे कडुन करण्यात आले आहेत.

error: Content is protected !!