सावंतवाडीत इन्व्हर्टर च्या उजेडात जुगार तेजीत

दस्तुरखुद्द पोलीस आय जी सिंधुदुर्गात असताना जुगार अड्डा सुरू करण्याची हिंमत

“रं” गलेल्या जुगाराचे “काळे” धंदे स्थानिक पोलीस आणि एलसीबी रोखणार कधी ?

सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील नरेंद्र डोंगर हे खरे तर पर्यटन केंद्र. पण ह्याच नरेंद्र डोंगराच्या आडवाटेवर स्पेशल बनवलेल्या झोपडीत सध्या अंदर बाहर जुगार अड्डा शुक्रवार पासून पुन्हा सुरू झाला आहे. नरेंद्र डोंगरावर इन्व्हर्टर च्या उजेडात अंदर बाहर जुगाराचे साथीदारांच्या ” रं” गत संगतीने “काळे” धंदे करणाऱ्यावर स्थानिक पोलीस आणि एलसीबी कधी कारवाई करणार ? असा सवाल आता सवंतवाडीकर करत आहेत. विशेष म्हणजे मागील काही दिवस बंद असलेला हा जुगार अड्डा पोलीस आय जी सिंधुदुर्गात असतानाच शुक्रवारी 8 फेब्रुवारीपासून पुन्हा तेजीत सुरू झाल्याने सर्वसामान्य जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्या कौटुंबिक शुभकार्याची बकरा मटण पार्टी नरेंद्र डोंगरावरील जुगार अड्ड्यावरच देत या” काळे ” धंदे करणाऱ्या जुगारी ने पोलिस आपले काहीच करू शकत नसल्याच्या आविर्भावात बकरा मटण पार्टीनंतर अंदर बाहर जुगार पट मांडला. या जुगारात लाखोंचा बाजार मांडला गेला आणि ” काळे ” धंदे करणाऱ्याला लाखोंचा फायदाही झाला. पालकमंत्री नितेश राणे यांनी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्यांना अभय नसल्याचे आधीच जाहीर केले आहे. मात्र सावंतवाडीत या जुगार अड्ड्याला कोणाचा वरदहस्त हा प्रश्न सावंतवाडीकर जनता करत आहे. खुद्द कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सिंधुदुर्गात असतानाही या “काळे” धंदेवाईकाची जुगार अड्डा सुरू करायची हिम्मतच कशी होते ? नरेंद्र डोंगरावर पाण्याच्या टाकीखाली इन्व्हर्टर च्या उजेडात रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला जुगार पहाटेपर्यंत सुरू असतो. जुगार खेळण्यासाठी स्पेशल झोपडीची सोय करण्यात आली आहे. पायवाटेपासून थोड्या आडबाजूला काही अंतर या झोपडीपर्यंत चालत जावे लागते. झोपडीपर्यंत च्या अंधाऱ्या वाटेवर जेव्हा जुगार खेळण्यासाठी खेळी जातात तेव्हा नेमण्यात आलेल्या रखवालदार सिग्नल देतो आणि खेळी साठी स्पेशल लावण्यात आलेले बल्ब इन्व्हर्टर वर ऑन केले जातात. जेव्हा सर्व खेळी जमा होतात तेव्हा खास लावण्यात आलेल्या इन्व्हर्टर वर अंदर बाहर चा जुगार तेजीत सुरू होतो. दररोज लाखो रुपयांचा टर्नओव्हर या जुगारात होतो. तेवढ्याच लाखोंचा फायदाही पट लावणाऱ्या” काळे ” धंदेवाईकाला होतो. नरेंद्र डोंगरावर रात्रीस चालणाऱ्या या खेळाकडे पोलीस यंत्रणा दुर्लक्ष का करत आहे हाच सवाल सध्या सावंतवाडीकर करत आहेत.

error: Content is protected !!