संजय राऊत मूर्ख माणूस,निंदा नालस्ती करणे हा त्याचा गुण

खा.नारायण राणे यांचे राऊतांच्या टीकेवर सणसणीत प्रत्युत्तर

मुंबई: अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप खासदार नारायण राणे यांनी सणसणीत उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा संजय राऊत हे मूर्ख माणूस असल्याची टीका राणेंनी केलीय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले, ते अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून आणलं का? असा सणसणीत टोला लगावला आहे.

काय म्हणाले संजय राऊत

दरम्यान संजय राऊत यांनी,निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे.सरकारने १२ लाख रुपयांच्या कमाईवर करची सवलत दिली खरी पण १२ लाख रुपये कसे आणावेत? असा सवाल संजय राऊत यांनी केली होता.लोकसभेत सादर करण्यात आलेला बजेट हा मध्यमवर्गीयांसाठी असल्याचं सत्ताधारी म्हणातात. पण सरकारने त्यांच्यासाठी काय केलं? देशातील महागाई कमी करण्यासाठी काय उपाय योजना आणली ? उद्योग धंदे वाढवण्यासाठी काय उपाय योजना आणली असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. महागाई आणि देशातील बेरोजगारी कमी होणार नसेल किंवा ते कमी करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या नसतील तर मध्यमवर्गीयांच भलं कसं होणार? डॉलर तुलनेत रुपया खाली आलाय.अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

खा.नारायण राणे यांचे खरमरीत प्रत्युत्तर

मूर्ख माणूस असल्याची टीका राणेंनी केलीय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले, ते अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून आणलं का? असा सणसणीत टोला लगावला आहे.खासदार नारायण राणे पुढे म्हणाले,एका बंद खोलीत टीका करणं, निंदा नालस्ती करणं, हा संजय राऊत यांचा गुण आहे. त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये, असं म्हणत नारायण राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप खासदार नारायण राणे यांनी सणसणीत उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा संजय राऊत हे मूर्ख माणूस असल्याची टीका राणेंनी केलीय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला चौदाव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणले, ते अर्थव्यवस्था समजत नाही म्हणून आणलं का? एका बंद खोलीत टीका करणं, निंदा नालस्ती करणं, हा संजय राऊत यांचा गुण आहे. त्यांच्या कोणत्याही टीकेची दखल घेऊ नये, असं म्हणत नारायण राणे यांनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

error: Content is protected !!