शिवराज राक्षे यांनी केली पंचाना मारहाण
ब्युरो न्यूज: .महाराष्ट्राच्या इतिहासात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्या नगर येथे आज अंतिम सोहळ्याने पार पडली मात्र या स्पर्धेला गालबोट लागले आहे. या स्पर्धेतील गादी विभागातील सामना सुरु असताना, स्पर्धेला गालबोट लागलं आहे. सामना सुरु असतानाच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
काय आहे सविस्तर वृत्त?
अहिल्यानगर येथे राज्य कुस्तीगीर संघ आणि जिल्हा कुस्तीगीर संघातर्फे महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत मोठा राडा झाला. उपांत्य फेरीत बाद झाल्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याने पंचांना मारहाण केली आहे. गादी विभागातील अंतिम सामना पृथ्वीराज मोहोळ विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात खेळवला गेला. सामना अतिटतीचा सुरू होता. तेव्हा मोहोळच्या एका डावात राक्षे पाठीवर आला अन् पंचांनी राक्षेला बाद घोषित केलं. पंचांनी पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केलं. त्यामुळे राक्षेला राग आला. माझी पाठ टेकलीच नव्हती, असं शिवराज राक्षे याने म्हटलं आहे.पंचांचा निर्णय शिवराज राक्षेला मान्य नव्हता. त्यामुळे काका पवारसह इतर पैलवानांनी पंचांच्या निर्णयावर आक्षेप नोंदावला. खेळाडूंनी मैदानातच वाद घातला. त्यामुळे पोलिसांना देखील मध्यस्थी करावी लागली. आर्मीचे जवान आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी सर्व पैलवानांना खाली उतरवलं. तर पोलिसांनी शिवराज राक्षेला तंबी दिली. शिवराज राक्षे याने पंचांची कॉलर धरली आणि लाथ देखील मारली होती. त्यानंतर शिवराज राक्षेला मैदानातून बाहेर काढण्यात आलं.
मुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत असताना झाला राडा
अजित पवार या स्पर्धेसाठी उपस्थित होते. अजित पवारांसमोर हा राडा झाला. अंतिम लढतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण होणार आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यास मानाच्या चांदीच्या गदेबरोबरच आमदार संग्राम जगताप यांच्यावतीने थार ही अलिशान चारचाकी गाडीही देण्यात येणार आहे. तसेच उपविजेत्या कुस्तीगीरास बोलेरो ही चारचाकी गाडी देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा कुस्तीगीर संघाचे सचिव डॉ.संतोष भुजबळ यांनी दिली.













