सावंतवाडी : सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे मैदानावर फिल्डींग करत असताना ते खाली कोसळले. त्यांना तातडीने ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले.
प्रवीण मांजरेकर यांनी कॉलेज जीवनापासूना पत्रकारितेला प्रारंभ केला. प्रारंभी ‘तरुण भारत’चे सातार्डा वार्ताहर, त्यानंतर बांदा प्रतिनिधी म्हणून त्यांनी अनेक वर्षे पत्रकारिता केली. नंतर काळात ते सावंतवाडी कार्यालयात उपसंपादक म्हणून रुजू झाले. या काळात त्यांनी विपुल लेखन केले. त्यांना पत्रकारितेसाठी सावंतवाडी तसा जिल्हा पत्रकार संघाचे पुरस्कारही मिळाले होते. अलिकडेच त्यांची जिल्हा पत्रकार संघाचे सहसचिव म्हणून निवड झाली होती. तर त्यांनी याआधी सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते.
कॉलेज जीवनापासून त्यांना नाटयक्षेत्राची आवड होती. दरवर्षी राज्य नाटय स्पर्धेत ते नाटके सादर करत. त्यांनी स्वतःच्या दिग्दर्शनाखाली विविध नाटके सादर केली होती. विविध नाटय, एकांकिका स्पर्धांसाठी परीक्षक म्हणूनही ते काम पाहत असत. सावंतवाडी तालुका भंडारी समाज संघटना कार्यातही त्यांचा सहभाग असे. त्यांच्या पश्चात्त आई, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. आरोस येथील विद्याविहार हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या प्रा. सुषमा मांजरेकर-गोडकर यांचे ते पती होत.

पत्रकार, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन
1
/
98
कोकणातला पहिला पाऊस... आणि चढणीचे मासे
कणकवली नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा! #kankavli #sindhudurg
मग मूठभर भगवाधार्यांसाठी पोलीस कशाला ? #niteshrane #kolhapur
छत्रपती शिवरायांचा मावळा असा छातीठोकपणे उभा राहतो #niteshrane #kolhapur
आम्ही सर्व धर्म समभाव आम्ही मानत नाही #niteshrane #kolhapur
या लोकांच्या अब्बाचा पाकिस्तान आहे का ? #niteshrane #kolhapur
जे नियम हिंदूंना लागतात ते नियम इतर धर्मांना पण लागले पाहिजेत... | Nitesh Rane #niteshrane
अणुऊर्जा प्रकल्पावर सुशांत नाईक यांचा राणेंना टोला - Sushant Naik #kankavli
आपल्या मर्जीशियावाय कोणालाही तिथे फिरकू देऊ नका #niteshrane #devgad #sindhudurg
पर्यावरणाला हानी पोहोचणारा कोणताही प्रकल्प कोकणात येऊ देणार नाही... #niteshrane
मी माझ्या देवगडवर कोणालाही वाकड्या नजरेने बघू देणार नाही - नितेश राणे #niteshrane
मुळात या प्रकल्पाबाबत आम्हाला कोणालाही माहिती - nitesh Rane #niteshrane
1
/
98

Subscribe










