पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती सराव परीक्षा संपन्न

कुडाळ : पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध व शिष्यवृत्ती सराव परीक्षा केंद्रस्तरीय पार पडली. पिंगुळी मध्ये पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १मध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता ४थी च्या व इयत्ता ७च्या मुलांनी तसेंच ५च्या मुलांनी शिष्यवृत्ती सराव परीक्षेत सहभाग घेतला.

यावेळी शाळेचे मुख्यध्यापक सदाशिव गावडे सर व केंद्र प्रमुख चव्हाण सर यांनी मुलांना मार्गदर्शन दिले. व सराव परीक्षेमध्ये मुलांना लागणारा सराव प्रश्नपत्रिका संच श्री गंगाराम सडवेलकर (माजी पं. स.सदस्य पिंगुळी )व बाबल गावडे (माजी ग्रामपंचायत सदस्य पिंगुळी )यांच्या मार्फत करण्यात आला. व सराव परीक्षेत सहभाग घेतलेल्या मुलाना पिंगुळी पूर्व प्राथमिक केंद्र शाळा नं १ शाळा कमिटी अध्यक्ष दीपक धुरी यांच्या कडून मुलांना अल्पोआहार देण्यात आला.

यावेळी सामाजिक कार्यकते दीपक गावडे, आदेश धुरी, राजन माणगावकर, गोडे, सराफदार तसेंच पालक उपस्थित राहून केंद्रस्तरीय सराव परीक्षा पार पडली.

error: Content is protected !!