दोडामार्ग : तिलारी धरणाच्या डाव्या कालव्यात साटेली भेडशी येथे कर्नाटक राज्यातील एका कामगाराचा मृतदेह गेट जवळ आढळून आला आहे. तर त्याच्या सोबत असलेला एक कामगार बेपत्ता आहे. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. कालव्यातील पाणी कमी करायला सांगितले आहे. हे कामगार खानयाळे येथे एका फार्म हाऊसवर फरशी बसवणे इतर कामासाठी आले होते. मुकादम याने दोन कामगार गोवा येथे गेले होते राजी माघारी आले पण ते कामाच्या ठिकाणी आले नाही. अशी माहिती दिली. सकाळी शोध घेताना एकाचा मृतदेह आढळून आला तर एक जण बेपत्ता होता