देवगड : देवगडमध्ये अनेक कला संस्था आहेत. काही प्रॅक्टिसमध्ये आहेत तर काही विश्रांती मोडमध्ये आहेत. देवगडमधून मागील दोन पिढ्यांपासून दिग्गज कलाकार आपली कला महाराष्ट्रभर सादर करीत होते आणि आहेत म्हणजेच देवगडमध्ये कलाकारांची खाण आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण खंत एकच आहे की या कलाकारांना व कला संस्थांना एकत्रित आणणारी ॲथोराईज्ड अशी संस्था देवगडमध्ये नाही.
याकरीताच पुण्यात मागील वीस वर्षे नाट्य व साहित्य परिषदेवर कार्यकर्ता ते कार्यवाह पदे भुषविलेले डाॅ.भाई बांदकर यांनी देवगडमधील जेष्ठ व श्रेष्ठ असे कलाकार व संस्थाचालक, दिग्दर्शक, लेखक, अभिनेते यांच्यासमवेत अ.भा.मराठी नाट्य परिषद देवगड शाखा सुरु करण्याची पावले उचलली आहेत.
श्री.प्रमोद नलावडे, श्री.विद्याधर कार्लेकर, श्री.प्रमोद जोशी, श्री.महादेव प्रभू, श्री.प्रसाद शेवडे, श्री.सचिन जाधव, सौ.विद्या माणगावकर, श्री.बाळा कदम, सौ.मनस्वी घारे, श्री.हर्षद जोशी, डाॅ.चव्हाण, सौ.प्रियांका वेलणकर, श्री.रमेश गोंधळी अशा अनेक कलाकार व पत्रकार बंधूनी या नाट्य परिषदेची मुहूर्तमेढ रोवण्याचे ठरविले आहे.
याकरीताच रविवार, दिनांक 19 जानेवारी, सकाळी 10 वाजता, सांस्कृतिक भवन, जामसंडे, देवगड येथे कलाकार मेळावा आयोजित केला आहे. देवगड तालुक्यातील सर्व कलाकारांना उपस्थित रहाण्याचे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी 8080620715 यावर संपर्क साधावा.