” माझे आडनाव राणे आहे, आम्ही सुरक्षा मागत नाही. लोकांना आमच्याकडून सुरक्षा लागते. ” अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री नितेश राणे यांनी पत्रकारांनी सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली.
गेल्या काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे यांचे दहशतवाद्यांच्या हिटलिस्ट मध्ये नाव असल्याची जोरदार चर्चा होती. यावर भाष्य करताना नितेश राणे म्हणाले की, त्यांच्याकडे जर त्यांची हिटलिस्ट असेल तर आमची देखील हिटलिस्ट तयार आहे. त्यांनी त्यांच्या हिटलिस्टवर काम करावं आम्ही आमच्या हिटलिस्टवर काम करू असे म्हटले. तसेच आमच्या हिंदुराष्ट्रमध्ये कोणालाही घाबरण्याची गरज नाही. आमचे केंद्र आणि राज्य सरकार सक्षम असून अशा हिटलिस्टला आम्ही भिक घालत नाही असे म्हटले.
त्यांच्या हिटलिस्ट पेक्षा आम्हाला आमची हिटलिस्ट महत्त्वाची आहे. या हिटलिस्ट मधील एकेका दहशतवाद्याला संपवणार असून ‘ हर एक को मिट्टी मे मिला देंगे ‘ अशी आमच्या सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी म्हटले.