ग्रामसंवाद उपक्रमाअंतर्गत सौरभ कुमार अग्रवाल, शिवापूर येथे गाव भेट


कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने ग्रामीण, दुर्गम भागातील नागरीकांना पोलीस दलाचा नागरीकांशी थेट संवाद व्हावा. त्याचप्रमाणे, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, डायल 112 हेल्पलाईन विषयक जनजागृती, विशेषतः ज्येष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा, नागरीकांच्या तक्रारींचे त्वरीत निरसण करण्यासाठी दि. 09/01/2025 ते दि. 23/01/2025 या कालावधीत ग्रामसंवाद उपक्रम राबविण्यात येत आहे.
सदर उपक्रमाची सुरुवात दि. 09/01/2025 रोजी शिवापूर, ता. कुडाळ येथे करण्यात येणार असून त्यासाठी मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग हे सकाळी 11.00 वाजता शिवापूर येथे उपस्थित राहणार आहेत.


उपरोक्त उपक्रमासाठी सर्व पत्रकार तसेच, शिवापूर गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरीक, विविध संस्थांचे अध्यक्ष व सदस्य, डॉक्टर, व्यापारी, समाजसेवक, सेवाभावी संस्थेच प्रतिनिधी, तलाठी, कोतवाल, ग्रामविकास अधिकारी / ग्रामसेवक, आरोग्य सेवक, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरीक, पोलीस पाटील, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, विद्युत विभाग, महिला, मुख्याध्यापक, शिक्षक इत्यांदींनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!