आपल्यातील सर्व ज्ञान शक्तीचा वापर करत चला – तहसीलदार वीरसिंग वसावे कुडाळ


कुडाळ : आपल्या मध्ये अनेक ज्ञान शक्ती असतात त्यातील काहींचाच आपण वापर करतो. आपल्या सर्व ज्ञान शक्तींचा वैविध्यपूर्ण वापर करत चला .कारण तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलासी अशा अवस्थेनंतर येणार नैराश्य त्यावर आपण मात करू शकतो .असे उद्गार कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी काढले. ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ च्या बॅरिस्टर नाथ पै बी.एड. या केंद्रातील विविध शिक्षणक्रमाचे एम ए एज्युकेशन, शालेय व्यवस्थापन पदविका, डिप्लोमा इन योगा टीचर या अभ्यासक्रमांच्या स्नेसंमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. त्यांनी आपल्या पुढील मनोगतामध्ये “निवृत्तीच्या जवळ येऊन सुद्धा या वयात चैतन्यदायी कार्यक्रम सादर करण्यास इच्छुक असलेल्या शिक्षकांचे कौतुक केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये अभावानेच आढळून येणारे प्रशिक्षणार्थ्यांचे इथे स्नेहसंमेलन आयोजित करणे ही गोष्टच अपूर्व आहे. नेहमीच्या रुटीन जीवनातून बाहेर पडून आयुष्यातील एन्जॉय न करता राहिलेल्या कला सादरीकरणाचा आनंद इथे आपण घेत आहात; याबद्दल आणि बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थायासाठी पुढाकार घेते. याने आपण भारावून गेलो असल्याचे प्रांजळपणे कबूल केले व स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.


यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत संस्था चेअरमन उमेश गाळवणकर, संस्था सीईओ अमृता गाळवणकर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ चे येथील केंद्रप्रमुख परेश धावडे ,केंद्र समन्वयक प्रा . नितिन बांबर्डेकर, केंद्र समंत्रक तथा सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा .अरुण मर्गज, समंत्रक मेघा पवार, डॉ .सतीश तेरसे फिजिओथेरपीचे प्राचार्य सुरज शुक्ला, नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य कल्पना भंडारी, सेंट्रल स्कूलच्या प्राचार्य चैताली बांदेकर, डॉ व्यंकटेश भंडारी,सर्व विभागाचे विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
चेअरमन उमेश गाळवणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये “शिक्षकांच्या मनातील सादरीकरण करायच्या राहिलेल्या कलेंना व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेने केंद्रप्रमुख, समन्वयक व समंत्रक यांच्या सहकार्यातून हे संमेलन आयोजित केलेले आहे… आणि वयाचा विचार न करता सर्व व्यापताप सांभाळून त्याला शिक्षकानी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद, राखलेला उत्तम दर्जा हा खरोखरंच कौतुकास पात्र असल्याचे सांगत स्नेहसंमेलनास शुभेच्छा दिल्या.केंद्रप्रमुख परेश धावडे यांनी सुद्धा आपले विविध शालेय व्याप सांभाळून या सांस्कृतिक स्नेहसंमेलनात सहभाग नोंदवल्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या .


प्रशिक्षणार्थी शिक्षक यांनी अतिशय उत्तमपणे, दर्जेदार अशा कला कार्यक्रमाचे सादरीकरण केले व उपस्थितांची उस्फूर्त दाद घेऊन उपस्थितांना खिळवून ठेवले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नितीन बांबर्डेकर यांनी केले तर सूत्रसंचालन मेघना राऊळ यांनी केले .तर उपस्थितांचे आभार सुरेखा परब यांनी मांनले.
तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून व श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

error: Content is protected !!