बाळूमामा या यशस्वी नाट्य प्रयोगानंतर या वर्षीसाठी नितीन आसयेकर प्रस्तुत श्री देवी भुमिका दशावतार लोककला नाट्य मंडळ मळगाव यांनी सादर केलेल्या संत कबीर या पहिल्याच नाट्य प्रयोगाला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पसंती दर्शविली. रामभक्तीवर आधारित असा हा दर्जेदार भव्यदिव्य ट्रिक सीन युक्त नाट्यप्रयोग मळगाव मध्ये मोठया दिमाखात सादर झाला. संत कबीर या दर्जेदार नाट्यप्रयोगाने सर्व रसिकांची मने जिंकली. भारतातील प्रसिद्ध संत म्हणून ज्यांची ओळख आहे. असे संत कबीर यांच्या जीवनावर आधारित दर्जेदार नाट्यप्रयोग नितीन आसयेकर यांनी रसिकांसाठी घेऊन आलेत याबद्दल रसिकांनी नितीन आसयेकर यांच्या भुमिका दशावतार नाट्य मंडळातील सर्व कलाकारांचे भरभरून कौतुक केले. अभिनयकुमार नितीन आसयेकर यांच्या भुमिका दशावतार नाट्य मंडळातून असे नवनवीन नाट्य प्रयोग रसिकांसाठी घेऊन येत आहेत याबद्दल सर्व रसिकांनी नितीन आसयेकर व त्यांचे सर्व कलाकार यांचे कौतुक केले. त्यांना अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊन प्रोत्साहन दिले .या मंडळाच्या माध्यमातून असेच नवनवीन नाट्यप्रयोग रसिकांसमोर घेऊन या व समाज प्रबोधन करावे अशी आशा रसिकांनी व्यक्त केली.














 
	

 Subscribe
Subscribe









