विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोपांची वादळी स्थिती निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सागर बंगल्यावर झालेल्या 25 मिनिटांच्या चर्चेनंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
