लायन्स फेस्टिव्हलमध्ये 3 ऱ्या दिवशी ‘जल्लोष’ची चर्चा

नृत्य-गीतांनी रसिक मंत्रमुग्ध

मृणाल सावंत, निधी वारंग यांचा सत्कार

कुडाळ : लायन्स महोत्सवात तिसऱ्या दिवशी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष 2024″  डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्टच्या महाराष्ट्र व गोवा येथील नामांकित कलावंतांनी  हिंदी मराठी व गोवन या जुन्या नवीन गीतांवर आपल्या सुरेल आवाजाने हजारो रसिकांना मंत्रमुग्ध केले.
  

लायन्स फेस्टिवलचा तिसरा दिवस गायक नृत्य कलावंतांनी यादगार ठरविला या बहारदार संगीत रजनी कार्यक्रमाची सुरुवात गणेश स्तवनाने झाली. महाराष्ट्र व गोवा येथील नामांकित कलावंतांनी आपल्या सुरेल आवाजाने जुनी नवीन गीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले ही गुलाबी हवा, अधीर मन झाले ,कजरारे कजरारे ,जवानी जानेमन, शिव महादेव शंभो अशी एकाहून अनेक सरस गीते सादर करीत रसिकांचे मनोरंजन करणारी गीते ठरली स्नेहल गुरव या गायिकेने यो बायलो यो हे गोवन गीत सादर करित रसिकांची फर्माईश  पूर्ण केली नॉन स्टॉप कोळी गीताने या दिमाखदार संगीत रजनेची सांगता झाली या कार्यक्रमात हर्षद मेस्त्री (स्वरकोकण रत्न), स्नेहल गुरव (प्रथितयश पार्श्वगायिका) आणि काश्मीरा सावंत (प्रथितयश पार्श्वगायिका) विश्वास सलगरे यांसारख्या अद्वितीय आणि प्रतिभावान कलाकारानी आपल्या मनमोहक गाण्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलें, तसेच खास आकर्षण म्हणून या दिवशी मराठी चित्रपटअभिनेत्री व नृत्यांगना श्वेता परदेशी हिचा अद्भुत नृत्यांगनेच्या अदाकारीचा अनुभव रसिकांनी घेतला. या संगीत रजनी कार्यक्रमात वाद्यवृंद हा सुद्धा महत्त्वाचा घटक होता. विशेष म्हणजे संगीताच्या ठेक्यावर हा कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार ठरला. वादकांमध्ये गिटार- प्रवीण जाधव, सांगली, हँडसोनीक, ढोलक, डोलकी- शेखर सर्पे, कणकवली, ऑक्टोपॅड – हर्षद खराडे, मालवण, सिंथेसाईजर – दिनेश वालावलकर, वालावल, तबला, डफ, तुंबा, ऑक्टोपॅड – सचिन कुडतडकर, परकर्षण – युवराज कुर्ले, गौरव पिंगुळकर – ढोलक, ढोलकी, संबळ – गंधार कदम यांनी दिली. सिने अभिनेत्री श्वेता परदेशी यांनी लावणी ,उडत्या चालीच्या गाण्यावर नृत्याविष्कार करत रसिकांचे मनोरंजन केले. यावेळी सर्व कलाकार तसेच कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंत , कोंकणी पोरग्या फेम निधी वारंग यांचा लायन्स पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार कऱण्यात आला.

यावेळी लायन्स माजी प्रांतपाल अजित फाटक अँड अजित भणगे  सीए, सुनील सौदागर लक्ष्मी ज्वेलर्सचे  राहुल पाटणकर, राजू पाटणकर अँड श्रीनिवास नाईक लायन सेवा संकुल अध्यक्ष ऍड अमोल सामंत लायन्स क्लब कुडाळ प्रेसिडेंट चंद्रशेखर पुनाळेकर लायन फेस्टिवल चेअरमन गणेश म्हाडदळकर आनंद बांदिवडेकर सीए सागर तेली, सुनेत्रा फाटक संजीव प्रभू  शोभा माने डॉ दीपाली काजरेकर प्रकाश नेरुरकर सुजाता तेली अनंत शिंदे नयन भणगे मिकी तेरसे मेघा सुकी राजवीर पाटील ,अँड मिहीर भणगे, जीवन बांदेकर शैलेश मुंडये, साईश सामंत कपिल शिरसाट राजन कोरगावकर मंजुनाथ फडके मनोज मठकर नितीन दळवी लायन्स, रोटरी क्लबचे पदाधिकारी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर रसिकवर्ग उपस्थित होता संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन बादल  चौधरी नागेश नेमळेकर व  निलेश गुरव यांनी केले. सिने अभिनेत्री श्वेता परदेशी यांनी सांगितले. सिंधूदुर्ग जिल्हा सांस्कृतिक कलाक्षेत्र आहे या ठिकाणी आम्हाला आमची कला सादरीकरण करता आली याचा मला अभिमान आहे  या सोहळ्याला लाभलेला तुमचा उस्फूर्त प्रतिसाद आमच्यासारख्या कलाकारांना प्रेरणा देणारा आहे असे  सांगितले.

error: Content is protected !!