पोईप हायस्कूलचे येथे प्रयोगशाळा इमारतीचे उद्घाटन

संतोष हिवाळेकर

पोईप एज्युकेशन सोसायटी संचलित सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल पोईप विरणचे माजी विद्यार्थी तथा मुंबई महानगर पालिकेचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी रमाकांत उर्फ आर डी परब यांनी आपली दिवंगत पत्नी सौ मृणालीनी रमाकांत परब यांच्या स्मरणार्थ पोईप हायस्कूलला सुमारे 15 लाख खर्चातुन सुसज्ज अशी प्रयोगशाळा इमारत बांधुन दिल्याने इमारतीचा लोकार्पण व उद्धाघाटन सोहळा शनिवारी संपन्न झाला.

यावेळी उद्योजक श्र दत्ता सामंत, प्रयोगशाळा देणगीदार आर डी परब, उद्योजक सुरेश नेरुरकर, पोईप संस्थेचे उपाध्यक्ष गोपीनाथ पालव, पोईप सरपंच श्रीधर नाईक, सनदी लेखापाल सुहास पालव, संस्था सचिव विलास माधव, संस्था संचालक महेंद्र पालव,महेश पालव, सत्यवान पालव,कमलेश प्रभू, विश्वनाथ पालव, नामदेव पुजारे,माजी नगरसेवक दिपक पाटकर,संजय माधव, अरूण भोगले, पोईप पोलिस पाटील अविनाश जाधव, बाबुराव चिरमुले, अरूण मेस्त्री, डॉ हर्षल परब, डॉ सुनिल परब, डॉ अस्मिता परब, मुख्याध्यापक विकास कुंभार,हेदुळ सरपंच प्रतिक्षा पांचाळ,वायगवडे सरपंच विशाखा सकपाळ,व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आर डी परब म्हणाले की मागिल कित्येक वर्षे पोईप हायस्कूलसाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळेची नितांत गरज होती. यासाठी आपण सामाजिक बांधिलकी जोपासुन व माजी विद्यार्थी जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी आपली दिवंगत पत्नी सौ मृणालीनी रमाकांत परब हिच्या स्मरणार्थ सुमारे 15 लाख रुपये खर्च करून सुसज्ज इमारत बांधलेली आहे. या इमारतीला आपली दिवंगत पत्नी सौ मृणालीनी रमाकांत परब असे नामकरण करावे अशी विनंती व इच्छा श्री परब यांनी पोईप हायस्कूल संस्था पदाधिकारी यांच्याकडे केली. तसेच याहिपुढे शाळेच्या भौतिक गरजा पुर्ण करण्यासाठी आपल्या परिवारा कडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी पोईप संस्था व हायस्कूल यांच्यावतीने त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी श्री आर डी परब यांच्या दातृत्वाबदल गौरवोद्गार काढले.

error: Content is protected !!