सावंतवाडी : नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती कीर्ती असलेल्या आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री देव लिंग क्षेत्रपाल देवाचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक २७ डिसेंबर रोजी होत आहे. सकाळी नऊ वाजल्यापासून ओटी भरणे, नवस फेडणे कार्यक्रम चालू होणार आहेत. रात्री अकरा वाजता पालखी सोहळा व त्यानंतर खानोलकर दशावतार कंपनी यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होईल.तरी सर्व भक्त आणि भाविकांनी श्री दर्शनाचा लाभ घ्यावा. असे आवाहन देवस्थान समिती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर परब यांनी केले आहे.