मागील 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड निश्चित झाली आहे. राज्यपालांच्या निर्देशांनुसार 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न झाले होते. मात्र, अखेर भाजपने प्रा. राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे शिंदे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.