मुंबई प्रतिनिधी: मंगळवारी विधानसभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक मांडले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्राचीन स्मारकांचे जतन करावे अशी मागणी केली. तसेच देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्यांकडूनही अनेकदा वस्तूंची तोडफोड होते. यावर निर्बंध घालण्यात यावे, असेही ते म्हणाले. यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. त्यानंतर आमदार शरद सोनवने म्हणाले, रायगड आणि शिवनेरी किल्ला हे महाराष्ट्राचे दैवत आहेत. जयपूरप्रमाणे किल्यावर राहणाऱ्या लोकांसाठ रोजगार निर्माण करावा. तसेच या दोन्ही किल्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा मोठा भगवा ध्वज लावण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन शिवनेरी आणि रायगड या दोन्ही किल्ल्यांवर स्वराज्याचा मोठा ध्वज लावला जाईल.