मंत्रिपद हुकल्यानंत्र आ.दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया
मुंबई प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्याच्या यंदाच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज पार पाडला असून यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून अनेक मात्तबर नेत्यांना डच्चू मिळाला आहे.दरम्यानमंत्रिपदाची संधी हुकल्यानंतर आ.दीपक केसरकर हे शिर्डी मधे साई बाबांच्या दर्शनासाठी गेले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यांची आता पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. शपथविधी हा मंत्र्यांचा असतो, अधिवेशन हे आमदारांसाठी असते. उद्या सकाळपासून अधिवेशन सुरू होणार असून, मला सकाळी अधिवेशनसाठी जायचं आहे. त्याअगोदर मी साईदरबारी आलोय असं त्यांनी यावेळी म्हटलं.
मंत्रिपदावर काय म्हणाले केसरकर
दरम्यान यावेळी आ.दीपक केसरकर यांना मंत्रिपद मिळू शकलं नाही, यावर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. माझी शिंदे साहेबांसोबत जबाबदारीबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही. मी त्यांना एकदाच भेटलो होतो, तेव्हा खूप आमदरांची गर्दी होती. तेव्हा मलाच वाटलं आपल्या नेत्याला आपण किती त्रास द्यायचा. त्यानंतर मी त्यांना एकदाही भेटलो नाही. मंत्रीमंडळातून डावलने हा काय भाग नसतो. शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे निर्णय मी घेतले. मराठी भाषा विभाग हा दुर्लक्षित विभाग होता, त्याला मराठी भाषा धोरण दिलं. मी जे काही केलं त्यात मी समाधानी आहे. साईबाबा जे काही घडवतात ते चांगल्यासाठीच घडवतात.



Subscribe









