महायुतीच्या मंत्र्यांचा शपथविधी नुकताच पार पडला. मात्र, मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले एकनाथ शिंदे गटाचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेना उपनेता पदाचा राजीनामा दिला आहे. भोंडेकर यांनी फक्त उपनेते पदाचा नाही तर पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला आहे. मंत्रिपदासाठी वर्णी न लागल्याने भोंडेकर नाराज होते, अशी माहिती समोर आली आहे. शिवसेनेच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.