तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मयुरेश कृष्णा भोई द्वितीय

52 वे तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनात ,मागासवर्गीय एज्यूकेशन सोसायटी संचालित प . पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्य .विद्यालय मांडकुली- केरवडे प्रशालेतून निबंध स्पर्धेत कुमार- मयुरेश कृष्णा भोई इ. ६ वी ते ८ वी गटात व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशासाठी संस्था अध्यक्ष श्री. श्रीधर पेडणेकर , सेक्रेटरी श्री. अंकुश जाधव ,कार्याध्यक्ष श्री. वामन गावडे, खजिनदार श्री. देवदत्त चूबे सर, सर्व संचालक, मुख्याध्यापक श्री. खोत सर , सर्व शिक्षक, कर्मचारी, व पालक यांनी अभिनंदन केले आहे. विज्ञान शिक्षक श्री. राहूल रविंद्र कानडे सर यांनी विज्ञान प्रदर्शनातील विद्यार्थ्यांच्या यशासाठी विशेष मार्गदर्शन व प्रयत्न केले. पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *