छत्रपतींचा पुतळा उभारण्याच्या कामाला वेग

मालवण : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळत्याच्या दुर्घटनेनंतर आता चार महिन्यांनंतर राज्य सरकारने याठिकाणी ६० फुटी पुतळा उभारण्याचे काम ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार आणि त्यांचा मुलगा अनिल सुतार यांच्या कंपनीला दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. राम सुतार आर्ट क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीने या आधी गुजरातमधील ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे काम पाहिले होते.

error: Content is protected !!